आजचे युग हे स्पर्धेचे युग असल्याने या युगाशी बरोबरी साधायची असेल तर संपूर्ण तयारीनेच उतरायला हवे. आजच्या तरुणाचे ध्येय हे उच्चपदस्थ अधिकारी व दिव्याची गाडी हे असल्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्याने आपला कल एम. पी. एस. सी. व यू. पी. एस. सी. कडे वळवला आहे. या स्पर्धात्मक परीक्षेमध्ये महत्त्वाचे कायदे अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. एकूण अभ्यासविषयक फायदे लक्षात घेऊन कायद्याचा मूळ अभ्यास असलेले अॅेड. अतुल रा. कुलकर्णी यांच्या लेखणीतून साकारलेले प्रस्तुत पुस्तक स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांना उपयुक्त व मार्गदर्शक ठरेल.
पुस्तकाची ठळक वैशिष्ट्ये त्राज्यसेवा मुख्य व पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षांच्या बदललेल्या नवीन अभ्यासक्रमावर आधारित. त्कायद्यातील सर्व दुरुस्त्यांसहित अद्ययावत माहितीचे संकलन. त्आयोगाने विचारलेल्या व संभाव्य सराव प्रश्नांचा समावेश. त्प्रत्येक कायद्याबाबत वस्तुनिष्ठ माहितीचे संकलन. त्विभागीय पोलीस उपनिरीक्षक, पोलीस भरती, सरळ सेवा भरती परीक्षा व विविध स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त. त्सर्व कायद्यांचे सर्वांना समजेल अशा सोप्या भाषेत विवेचन. त्कायद्याचा अभ्यास नसणार्यांनाही सहज समजेल अशी साधी व सोपी भाषा. त्आतापर्यंत प्रकाशित कायद्याचे आपल्या प्रकारचे एकमेव पुस्तक. त्स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त.